मंतरलेले पाऊसपाणी - पावसावरच्या कविता आणि स्फुटलेखन अभिवाच

Meeting Details

Meeting Date 29 Aug 2023
Meeting Time 19:30:00
Location Sevasadan Pune
Meeting Type Regular
Meeting Topic मंतरलेले पाऊसपाणी - पावसावरच्या कविता आणि स्फुटलेखन अभिवाच
Meeting Agenda
Chief Guest विद्या भागवत
Club Members Present 6
Minutes of Meeting मंतरलेले पाऊसपाणी हा कोणता विषय आणि यावर अभिवाचन करण्यासारखे काय असेल बरं... या विचारातच सेवासदनला पोहचलो. कार्यक्रम सुरू झाला आणि बघता बघता चढत्या क्रमाने बहरत गेला. त्यांच्या वाचनातून आणि रानडे यांच्या लेखणीतून आलेल्या शब्दांनी कमाल केली.... मुबाईतील पावसाने सुरवात झाली आणि बस थांब्यावरच्या आजींनी महाबळेश्वर आणि वाई येथील पावसाचे त्यामुळे साठणाऱ्या शेवाळ्याचे चित्र उभे केले. मग इंफाळ येथील ढगांची दाटी, आकाशात वर न दिसता दरीत दिसणारे इंद्रधनुष्य, विजेच्या लोळाने पेटवलेल्या झाडाचा बुंधा बघून गावात हलवलेला मुक्काम... मग नव्या घरातील तो कोंडत वास, मंगलोर कौले आणि त्यावरचे शेवाळे अशी अनेक वळणे घेत आम्ही हिमालयातील गंगोत्रीच्या खोऱ्यातील हत्तींच्या साठमारी सारखी दिसणारी ढगांची टक्कर, विजेचे आसूड ओढणाऱ्या आणि आभाळाच्या रंगमंचावर या विंगे पासून दुसऱ्या विंगे पर्यंत तांडव करणारे विजेचे लोळ, लहान मुलांच्या करंगळी एव्हड्या पावसाच्या धारा सुद्धा अनुभवल्या. मिलिटरी च्या कार्गो विमानातून केलेला पावसाच्या ढगांमधून केलेला प्रवास आणि त्याच्या पार्श्वभूमी वर असलेली दंगल, कोलकात्यातील पडणाऱ्या पावसाच्या अनुभूतीपासून ते मुंबईतील एक मजला पाण्यात बुडालेल्या सर्व गोष्टींची अनुभूती घेत आमचे विचारांचे विमान वेळेची घंटा झाल्यामुळे सेवासदनच्या हॉल मध्ये लँड झाले... सध्या पावसाळा असून पाऊस पडत नाहीये पण अर्थपूर्ण शब्दांचे वाचिक अभिनयाची जोड देऊन केलेले वाचन एक वेगळीच अनुभूती देऊन चिंब भिजवून गेले हे मात्र खरे आहे. प्रमुख पाहुण्यांची ओळख रो. आमोद फडके यांनी करून दिली आणि आभार प्रदर्शन रो. सुनया आपटे यांनी केले. क्लब तर्फे पाहुण्यांना भेट वस्तू देण्यात आल्या.